या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Monday 8 October 2007

स्वामी: जी ए कुलकर्णी

बर्‍याच दिवसात ही अनुदिनी लिहीण्यास सूर गवसला नव्हता. पण ट्युलिपने खो दिल्यावर आता 'आलिया ब्लॉगासि असावे सादर!'
आवडती पुस्तके, आवडते उतारे भरपूर आहेत. (पण ती वाचनालयात शोधून त्यातले उतारे टंकण्याच्या आळशीपणामुळे नेटावरच आयतं काही मिळतंय का शोधलं.एक आवडती कथा, पूर्ण नव्हे, पण त्यातला काही भाग नेटावर मिळाला.)

'स्वामी'. जी. ए. कुलकर्णींची एक समर्थ कथा. माणसाला जगायला किती जागा आणि किती वस्तू लागतात? 'देवा सोडव रे बाबा या त्रासातून' असं त्राग्याने बरेचदा म्हटलं तरी खरंच सर्व समस्यांपासून, व्यक्तींपासून सुटका मिळाली तर ती सुटका सहन होते का? असे अनेक प्रश्न निर्माण करणारी. गावात एकटा पडलेला एक मनुष्य 'आता पुढे काय' या विचारात असताना त्याला एक महंत भेटतो. महंताचे त्यांच्या मठात येण्याचे निमंत्रण हा एकला प्रवासी स्वीकारतो. मठात त्याची चांगली सरबराई होते. रेशमी वस्त्रे, गरम पाणी, चांदीच्या पेल्यातून दूध आणि फळे. 'असे विलासी आयुष्य सहज मिळणार असेल तर जन्मभर येथे राहायची आपली तयारी आहे' असा विचार करणार्‍या या प्रवाश्याला हे माहिती नाही की जन्मभर इथेच आयुष्य काढायचं प्राक्तन त्याच्या समोर आहे. महंत बोलताना त्यांच्या आद्य गुरुंचा मोठ्या आदराने उल्लेख करतात. स्वामींच्या मृत्यूनंतर पीठ रिकामे आहे आणि एकशे आठ दिवसांच्या आत नव्या स्वामींचा शोध करणे आवश्यक आहे. 'पण अमुक एक माणूस तुमच्या स्वामींचा अवतार बनायला योग्य आहे' हे कसे कळते? प्रवासी कुतूहलाने विचारतो. 'जुन्या स्वामींच्या आसनावर बसून अशा अवतारी पुरुषाने बोट वर केले तर त्याच्या बोटातून बेलाचे त्रिदल उगवते.'

प्रवाश्याला याबाबत कुतूहल वाटते आणि अविश्वासही. त्याला बर्‍याच पायर्‍या उतरुन एका अत्यंत अरुंद जागी स्वामींच्या आसनाजवळ एकट्याने नेले जाते. आणि बाहेरुन दरवाजा कायमचा बंद केला जातो! 'पूर्वीच्या स्वामींप्रमाणेच' पूर्ण आयुष्य त्याला आता या खोल भुयारात, अरुंद जागेत काढायचे असते. बाहेरच्या जगाशी संपर्क नाही, फक्त योग्य त्या वेळांना जेवणाचे ताट आत सरकवले जाणार आणि भुयारातून वर आणलेल्या हवेच्या नळ्यांमुळे श्वासोश्च्वासाला हवा मिळणार. आपण वाचून सुन्न होतो. शुद्ध फसवणूक आहे ही! पण महंताकडे मात्र कारणमिमांसाही असते. (तीही आपल्याला पटत नाही.) कथा श्वास रोखून पुढे वाचल्याशिवाय राहवतच नाही. त्याच 'स्वामी' कथेतला हा एक उतारा(माफ करा, उतारा जरा जास्त लांबला आहे, पण या कथेतील अगदी छोटासा भाग महत्त्वाचा म्हणून इथे देऊन बाकी भाग वगळणे जमतच नाही, कारण प्रत्येकच उतारा महत्त्वाचा वाटतो. कथा प्रत्यक्षच मिळवून नक्की वाचा. संग्रह- पिंगळावेळ, कथेचे नाव 'स्वामी'.):


या नंतर मी पुढचा खो या व्यक्तींना देते आहे:
अदिती
कोहम
राहुल फाटक
अत्यानंदराव
पूनम

(माफ करा हं, बरेच दिवस या आंतरजालीय खो खो च्या खेळाशी संपर्क नव्हता, त्यामुळे कोणाला दुसर्‍यांदा खो गेला असल्यास दुर्लक्ष करावे.)
- (बैठे खेळ प्रेमी) अनु.

10 comments:

सर्किट said...
This comment has been removed by the author.
a Sane man said...

wow...ha kathasangrah mi vachalela nahi...paN aata nakkich vachava lagel...

Anonymous said...

anu,

utara avaDala.

Yogesh said...

'स्वामी' ही जीएंची सर्वात आवडती कथा. कथा वाचताना अगदी गुदमरल्यासारखे होत राहते. वाचल्यानंतर आठवडाभर काहीही करावे/वाचावे वाटत नाही.


दुर्दैवाने माझ्याकडे असलेली पिंगळावेळ आणि काजळमाया ही दोन्ही पुस्तके सध्या बाहेर असल्याने मला त्यातील उतारा देणे जमले नाही. पण वरुणच्या अनुदिनीवर स्वामीतील खालील उतारा सापडला.

"
तू असाच वर जा.अंधाऱ्या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणाऱ्या ईर्षेने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सूर्यप्रकाशाला भेटू दे.तुला जर फुले येतील -आणि तुला सोन्याच्या लहान पेल्यांसारखी फुले यावीत व त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोके पिवळी सुगंधी व्हावीत.तुला जर फुले येतील, तर अश्या सहस्र फुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरे जा व त्याच्या निळ्या साक्षीने तू त्यांच्यात सूर्यप्रकाश साठवून घे.तुला जर फळे येतील- आणि तुला दर पानाआड लहानसे लाल फळ यावे व ते इतके रसरशीत असावे की त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सूर्यप्रकाशाचा एक एक कण सतत सुखाने नांदत राहावा.तुला जर फळे येतील, तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पाहा. कारण तू अश्या अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस.मग तुझ्या बीजांची फळे सर्वत्र विखरून त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत. जर कणाएवढ्या प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला तर तू त्याचे स्वागत कर.त्या कणाच्या अभिमानाने त्याने रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन त्याचा एक एक कण प्रकाशीत केला आहे.आभाळात एखादे लहान पाखरू उडताना दिसले तर तू त्याला आतिथ्य दाखव. कारण दोन कोवळ्या पंखाच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटतं आहे. जर कधी एखाद्या मुलाने तुझे एक रसरशीत पान घेऊन दुमडून पुन्हा ते आडवे उघडले व पानाचा आरसा केला; किंवा कधी तुझे पिवळे फूल तोडून बोटे पिवळ्या धुळीने माखून घेतली; अगर तुझे एक लाल फळ खुडून ते दोन बोटात चेंगरत रसाचा लाल धागा काढला, तर त्याच्यावर कृद्ध होऊ नकोस.कारण, कुणास ठाऊक, अब्जामध्ये एक आढळणारे असे ते मूल असून ते देखील भोवतालच्या अजस्र भिंती फोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधीतरी धडपड करणार असेल.आणि तसे असेल तर ते तुझ्या रक्तानात्याचेच आहे.म्हणून तू त्याच्यावर कृद्ध होऊ नकोस.एक पान गेल्याने तुला दारिद्र्य येणार नाही,एक फूल गेल्याने तुझे सौंदर्य उणे भासणार नाही.एक फळ नाहीसे झाल्याने तुझ्या आयुष्यात नैराश्य येणार नाही.इतके वैभव तुला आहे. इतके वैभव तुला मिळो!या साऱ्यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एक पान म्हणजे माझा एक एक श्वास आहे. म्हणून तू म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर केवळ बदललो आहे. तू आपले सारे सामर्थ्य घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे.मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या करंज्यांप्रमाणे वर आलो आहे, हे देखील इतरांना कळू दे.म्हणून तू असाच वर जा.

"

पूनम छत्रे said...

thanks anu for tagging me. my honour and pleasure too :) nakki takate yaa aathavadyaat.

राफा said...

अनु, ’टॅग’ल्याबद्दल धन्यवाद :). तुझे हे पोस्ट मग शांतपणे वाचतो. (त्या निमित्ताने पुन्हा ब्लॉगायला चालू झालीस हेही नसे थोडके.) सध्या लिहायला मला अंमळ अवघड आहे. (परदेशात तर आहेच आणि ’कामगार विश्व’ (किंवा ’त्यांची माती आमची माणसं’) चालू आहे ! :)) त्यामुळे कृपया शिष्टपणा किंवा आगाऊपणा समजू नये !
thanx again !

TheKing said...

Have heard a lot about G A, and after reading about this story it seems like high time to start reading G A.

priyadarshan said...

माझी जीएंची सर्वात आवडती कथा म्हणजे "विदुषकाची " कथेचे नाव मला आठवत नाही.

Aniruddha G. Kulkarni said...

Story name is "Vidushak".

Read a couple of couplets of GAK here:
http://searchingforlaugh.blogspot.com/2007/11/what-if-world-transformed-according-to.html

Anonymous said...

mazi sagalyat aavadati G.A.n chi goshta mhanje "Kairi".
Itaki sundar katha durmil asatey.