tag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post397421437898740464..comments2024-01-21T00:02:48.774+05:30Comments on मी अनु: स्वामी: जी ए कुलकर्णीअनुhttp://www.blogger.com/profile/01498454572210371553noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post-1604142413616356412010-11-03T20:11:01.900+05:302010-11-03T20:11:01.900+05:30mazi sagalyat aavadati G.A.n chi goshta mhanje &qu...mazi sagalyat aavadati G.A.n chi goshta mhanje "Kairi".
Itaki sundar katha durmil asatey.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post-87238795311197726582007-11-03T08:40:00.000+05:302007-11-03T08:40:00.000+05:30Story name is "Vidushak".Read a couple of couplets...Story name is "Vidushak".

Read a couple of couplets of GAK here:
http://searchingforlaugh.blogspot.com/2007/11/what-if-world-transformed-according-to.htmlAniruddha G. Kulkarnihttps://www.blogger.com/profile/09246236261997672943noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post-39307306600936736532007-10-12T22:16:00.000+05:302007-10-12T22:16:00.000+05:30माझी जीएंची सर्वात आवडती कथा म्हणजे "विदुषकाची " क...माझी जीएंची सर्वात आवडती कथा म्हणजे "विदुषकाची " कथेचे नाव मला आठवत नाही.priyadarshanhttps://www.blogger.com/profile/00578953958032998183noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post-9431290054712505782007-10-10T10:32:00.000+05:302007-10-10T10:32:00.000+05:30Have heard a lot about G A, and after reading abou...Have heard a lot about G A, and after reading about this story it seems like high time to start reading G A.TheKinghttps://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post-90618780352822647822007-10-09T14:46:00.000+05:302007-10-09T14:46:00.000+05:30अनु, ’टॅग’ल्याबद्दल धन्यवाद :). तुझे हे पोस्ट मग श...अनु, ’टॅग’ल्याबद्दल धन्यवाद :). तुझे हे पोस्ट मग शांतपणे वाचतो. (त्या निमित्ताने पुन्हा ब्लॉगायला चालू झालीस हेही नसे थोडके.) सध्या लिहायला मला अंमळ अवघड आहे. (परदेशात तर आहेच आणि ’कामगार विश्व’ (किंवा ’त्यांची माती आमची माणसं’) चालू आहे ! :)) त्यामुळे कृपया शिष्टपणा किंवा आगाऊपणा समजू नये !
thanx again !राफाhttps://www.blogger.com/profile/15326747250345095645noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post-11215734854622518592007-10-09T13:17:00.000+05:302007-10-09T13:17:00.000+05:30thanks anu for tagging me. my honour and pleasure ...thanks anu for tagging me. my honour and pleasure too :) nakki takate yaa aathavadyaat.पूनम छत्रेhttps://www.blogger.com/profile/06307636729897374250noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post-58726352099810798132007-10-09T10:46:00.000+05:302007-10-09T10:46:00.000+05:30'स्वामी' ही जीएंची सर्वात आवडती कथा. कथा वाचताना अ...'स्वामी' ही जीएंची सर्वात आवडती कथा. कथा वाचताना अगदी गुदमरल्यासारखे होत राहते. वाचल्यानंतर आठवडाभर काहीही करावे/वाचावे वाटत नाही.

दुर्दैवाने माझ्याकडे असलेली पिंगळावेळ आणि काजळमाया ही दोन्ही पुस्तके सध्या बाहेर असल्याने मला त्यातील उतारा देणे जमले नाही. पण वरुणच्या अनुदिनीवर स्वामीतील खालील उतारा सापडला.

तू असाच वर जा.अंधाऱ्या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणाऱ्या ईर्षेने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सूर्यप्रकाशाला भेटू दे.तुला जर फुले येतील -आणि तुला सोन्याच्या लहान पेल्यांसारखी फुले यावीत व त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोके पिवळी सुगंधी व्हावीत.तुला जर फुले येतील, तर अश्या सहस्र फुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरे जा व त्याच्या निळ्या साक्षीने तू त्यांच्यात सूर्यप्रकाश साठवून घे.तुला जर फळे येतील- आणि तुला दर पानाआड लहानसे लाल फळ यावे व ते इतके रसरशीत असावे की त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सूर्यप्रकाशाचा एक एक कण सतत सुखाने नांदत राहावा.तुला जर फळे येतील, तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पाहा. कारण तू अश्या अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस.मग तुझ्या बीजांची फळे सर्वत्र विखरून त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत. जर कणाएवढ्या प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला तर तू त्याचे स्वागत कर.त्या कणाच्या अभिमानाने त्याने रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन त्याचा एक एक कण प्रकाशीत केला आहे.आभाळात एखादे लहान पाखरू उडताना दिसले तर तू त्याला आतिथ्य दाखव. कारण दोन कोवळ्या पंखाच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटतं आहे. जर कधी एखाद्या मुलाने तुझे एक रसरशीत पान घेऊन दुमडून पुन्हा ते आडवे उघडले व पानाचा आरसा केला; किंवा कधी तुझे पिवळे फूल तोडून बोटे पिवळ्या धुळीने माखून घेतली; अगर तुझे एक लाल फळ खुडून ते दोन बोटात चेंगरत रसाचा लाल धागा काढला, तर त्याच्यावर कृद्ध होऊ नकोस.कारण, कुणास ठाऊक, अब्जामध्ये एक आढळणारे असे ते मूल असून ते देखील भोवतालच्या अजस्र भिंती फोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधीतरी धडपड करणार असेल.आणि तसे असेल तर ते तुझ्या रक्तानात्याचेच आहे.म्हणून तू त्याच्यावर कृद्ध होऊ नकोस.एक पान गेल्याने तुला दारिद्र्य येणार नाही,एक फूल गेल्याने तुझे सौंदर्य उणे भासणार नाही.एक फळ नाहीसे झाल्याने तुझ्या आयुष्यात नैराश्य येणार नाही.इतके वैभव तुला आहे. इतके वैभव तुला मिळो!या साऱ्यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एक पान म्हणजे माझा एक एक श्वास आहे. म्हणून तू म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर केवळ बदललो आहे. तू आपले सारे सामर्थ्य घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे.मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या करंज्यांप्रमाणे वर आलो आहे, हे देखील इतरांना कळू दे.म्हणून तू असाच वर जा.

"Yogeshhttps://www.blogger.com/profile/08611408610914710796noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post-87423051381332015072007-10-09T08:23:00.000+05:302007-10-09T08:23:00.000+05:30anu,utara avaDala.anu,

utara avaDala.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post-37513376513044512402007-10-09T05:17:00.000+05:302007-10-09T05:17:00.000+05:30wow...ha kathasangrah mi vachalela nahi...paN aata...wow...ha kathasangrah mi vachalela nahi...paN aata nakkich vachava lagel...a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4248714418096869316.post-16938291872456889982007-10-09T01:42:00.000+05:302007-10-09T01:42:00.000+05:30This comment has been removed by the author.सर्किटhttps://www.blogger.com/profile/11429759787103355558noreply@blogger.com