या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Wednesday, 24 January 2007

खारोळ्या (अर्थात खाद्य चारोळ्या)

चवीनं खाणारं कुणी असेल,
तर बनवण्याला अर्थ आहे..
कुणाचंच पोट तृप्त करणार नसेल,
तर पुरणपोळी सुद्धा व्यर्थ आहे..

इथे प्रत्येकजण महिला मंडळात,
व फ्रोझनफूडने फ्रिझ पॅकबंद आहे,
तरीही पाककृतींवर बोलणं
हा प्रत्येकीचा आवडता छंद आहे..

तू समोर असलास कि
नुसतंच तुला जेवू घालणं होतं,
आणि तू जवळ नसताना
कसंबसं घास गिळणं होतं..

स्वयंपाकघर दोघांचं असतं,
ते दोघांनी सावरायचं..
एकानं खाणं बनवलं,
तर दुसर्‍यानं भांडं धुवायचं..

चमचमीत खाणं वजा केल्यावर
बाकी काही उरत नाही..
चटपटीत खाण्याशिवाय मी किचन
किचनच धरत नाही..

रिसेप्शनला जाऊन माणसं
हॉटेलात गेल्यासारखी वागतात,
छोटासा आहेर देऊन,
लगेच बुफेला रांगा लावतात..

'रसमलाई' या शब्दात
केवढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
जिभेवर घोळल्याचा भास आहे..

कुणीतरी लागतं
आपल्याला 'खादाड' म्हणणारं..
खादाड म्हणताना
आपल्या आवडीनिवडी जपणारं..

(प्रेरणा : मी माझा)
- अनुराधा कुलकर्णी

8 comments:

Girish said...

mastach....jabari lihites :-)

seemajadhav46 said...

very good &realistic.waiting for new additions my email id is seemajadhav46@yahoo.com

Anonymous said...

ekdam chavishTh

Prachi

कांचन कराई said...

धम्माल आहेत चारोळ्या. मनापासून आवडल्या. मी फॉरवर्ड केल्या तर चालतील का. ब्लॉगचं नाव आठवणीने लिहीन. (मी अनु की मी खाबू?)

हेडरवचं चित्रं दिसत नाही :-(

Pallavi said...

फार सुंदर लिहिल्या आहेत!

marathisuchi said...
This comment has been removed by the author.
marathisuchi said...

khoopach chan aahet hya "kharolya"
just added it to http://www.marathisuchi.com/upcoming.php

Ravi said...

1 number .. vachun bhook lagli.. snack time!!