या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Monday 12 March 2007

नाही राहिले शेंग चवळीची..

"हाय! केवढ्या दिवसाने भेटतेयस? आणि तब्येत पण बरीच सुधारलेली दिसतेय..काही आनंदाची बातमी वगैरे नाही ना?" -नीतू.
(अनु मनातल्या मनात कळवळते..'हा' वार तिच्या गुटगुटीत बाह्यरुपाखालील सडसडीत काळजावर खो ऽऽऽल रुततो.)
"नाही गं! बैठी नोकरी, नाश्ता जेवण देणारी कचेरी आणि पंधरवड्याला हॉटेलाची वारी याचे परीणाम. जरा नोकरीचं व्यवस्थित झालं कि मनावर घ्यायचं आहे बारीक व्हायचं."-अनु.

घरी जाऊन परत दर्पणाला प्रश्नः सांग दर्पणा, 'जाडी' नाही ना रे मी?"
दर्पणः(जिवाच्या भितीने घाबरत घाबरत)-"नाही गं..फक्त अजून ३ इंच उंच पाहिजे होतीस. म्हणजे उंचीला वजन अगदी चपखल झालं असतं.."

अनु(शिंप्याला)-"आणि हे पहा, फिटिंग नीट करा. ढगळ शिवू नका मागच्या वेळसारखा."
शिंपी(मूर्तीमंत रामशास्त्री प्रभुणेंचा स्पष्टवक्तेपणा अंगी बाळगणारा)-"अहो ताई,तुम्हाला शोभणार नाही म्हणून जरा सैलच शिवतो हो. नंतर घट्ट झाला कि 'कसा शिवला?' म्हणून तुम्ही परत शिंप्याला शिव्या घालणार."

"नाही आज जरा कमीच खाते.गुलाबजाम पण आहे खाण्यात.ते अजून खूप खूप उष्मांक होणार."-अनु. "खा गं.आज भाजी कधी नव्हे ती चांगली आहे. आणि ढोले, खाणं कमी करण्यापेक्षा जरा हालचाल कर.काम करतेस कि नाही काही घरी?"-इति मैत्रिण.
"काय हे? इतकी कसरत करुन घालावी लागते तर घालू नकोस ही जीन्स. आपण नविन मोठी साइझ घेऊ."-आशू.
"अजिबात नाही.मोठी जीन्स विकत घेणं ही हार आहे. मी बारीक होणार आणि हीच जीन्स घालणार." "अगं पण श्वास रोखून पोट आत ओढून धरलं तरच तुला ती आता घालता येतेय. तू आणखी ८ तास पोट आत ओढून धरणार? आणि दुपारी जेवल्यावर काय करणार?"-(तर्कशुद्ध)आशू.
"नाही मी उद्यापासून सकाळी बिल्डिंगला ४ फेऱ्या मारणार. आल्यावर अर्ध्या तासाने मधपाणी पिणार आणि मग थोडा प्राणायाम करणार रोज."

'सकाळ' उजाडते. घड्याळाचा गजर तत्परतेने वाजतो. "जाऊदे. झोप पण महत्वाची त्वचेच्या आरोग्यासाठी. त्यापेक्षा कोशिंबीरी जास्त खाऊया."
असं म्हणून अनु साखरझोपेचा पवित्र उपक्रम चालू ठेवते.
'कोशिंबीरी' खाण्याची वेळ येते. "हे काय? नुसता कांदा?कांदा खाऊन दुपारभर तोंड उचकून सहकाऱ्यांशी बोलू कशी?जाऊदे. आज भात रद्द करु. पोळ्या २ खाऊ. भाजी आज मस्त झालीय पनीरची म्हणतात. खाऊया.आज बसने आधीच्या स्टॉपवर उतरुन चालत जाऊया."

'आधीचा स्टॉप' आला. "नको बाई इतकं चालायला. आधीच थकवा आलाय.वर घरी जाऊन स्वयंपाक करायचाय.उतरुया जवळच्या स्टॉपवरच. वाटलं तर रात्री चालू जेवण झाल्यावर."
'जेवण झाल्यावर'- "जाऊदे बाई. आता झोप आली. उद्या परत लवकर उठायचंय.झोपून टाकूया."

अशा प्रकारे अनु 'गुटगुटीत बांधा.थोडी बारीक असती तर चाललं असतं' या सदरात मोडणं चालू ठेवते. आणि 'जास्त लठ्ठ माणसांबरोबर वावरणे' हा रामबाण उपाय अवलंबते. (बिरबलाची गोष्ट. रेष न पुसता लहान करायची आहे? तिच्याशेजारी मोठी रेष काढा.)

फर्ग्युसन रस्ता. कॉलेज तरुणींनी फुललेला. अद्ययावत जीन्स. स्कर्ट. अलाण्या सिनेमातल्या फलाण्या नायिकेसारखा पंजाबी पोषाख. नाना तऱ्हा.
"मलापण पाहिजे असे कपडे. पण आधी बारीक व्हायचं.ठरलं तर. उद्यापासून सकाळी बिल्डिंगला ४ फेऱ्या. आल्यावर अर्ध्या तासाने मधपाणी पिणार आणि मग थोडा प्राणायाम रोज. "
अनु 'निश्चय' करते आणि पोट आत घेऊन आत्मविश्वासाने चालायला लागते.
-अनुराधा कुलकर्णी

7 comments:

कोहम said...

hi anu,

this is not a comment on your blog. Just need some help. Since you write on Manogat as well, would you have any idea as to how to create account therein. I just cant find create account facility anywhere....

अनु said...

कोहम,मनोगतावर आधी 'सदस्य व्हा' असा दुवा होता.पण सदस्यसंख्या जवळजवळ ६००० पर्यंत वाढल्याने एकदा डाटाबेस कोसळला.त्यानंतरच्या मनोगतात ही सोय बंद केली आहे.काही कल्पना नाही, कदाचित सर्व दुरुस्तीकाम झाल्यावर परत चालू होईलही.

Yogesh said...

U know I did send this blog to my sweet cute and lovely friend of mine... donno kaay honaar maaze aata...

सर्किट said...

haa..haa.. :-)

chhaan lihita tumhi. tumacha sankalp pratyakshaat utaro ya shubhechchhaa. :-D

mazya blog varachya comments sathi dhanyawaad.

blog chya setting baddal chya prashnala uttar asa ki, mi templete select karatana "minima stretch" navachi nivadali ahe. tumhi "stetch" type chi asaleli konatihi template nivada, asa effect miLel.

Vidya Bhutkar said...

I think smart women(Gals?) think alike. :-)मी ही गेले ८-१० महीने जमेल तशी gym ला जातेय पण व्यायाम कमी आणि आरशात पाहण्यातच जास्त वेळ जातो. :-) शिवाय, व्यायामाच्या नावावर जास्त खाते ते वेगळंच.
:ड असो.लेख छान आहे, नेहमीप्रमाणे.All the best.
-विद्या.

पूनम छत्रे said...

ajunahi madh-pani, colony la ferya chaloo aahet? ka ata chaloo karanar aahaat? :) all the best. mala jamala nahi, tumhala jamava hi sadichhaa :)

हेरंब said...

नेमेची येतो मग पावसाळा :)