उत्पादन नव्हे, अनुभव विका!!
ऑडीटोरीयम:"आपण उत्पादने नाही, अनुभूती विकणार आहोत ग्राहकाला.यापुढे मनाशी निश्चय करा.सुंदर ताज महाल आपले प्रतीस्पर्धी विकतात. आपण गिर्हाईकाला ताज महाल नाही विकायचा, त्याला 'मी ताज महाल, लिबर्टीबाईचा पुतळा, माचू पिचू, पिरॅमिड,बुर्ज खलिफा बनवू शकतो' हा आत्मविश्वास, ही अनुभूती विकायची आहे.गिर्हाईकाचा खिसा कोणीही टॉम डिक हॅरी जिंकतो. आपल्याला त्या खिश्याच्या खालचे त्याचे हृदय जिंकायचे आहे."
'संत योहानेस डिक्ली' यांचे दर वर्षाच्या आरंभाला होणारे 'आगामी वर्षः आव्हाने आणि महत्वाकांक्षा' या विषयावर दोन तासांचे व्हिडियो प्रवचन चालू होते.व्हिडियो हा दुतर्फा असल्याने संत योहानेस डिक्लींना आपलं प्रवचन ऐकणारे पामर जन दिसणार होते आणि श्रोत्यांना संत डिक्ली आणि त्यांचे हपिस आणि त्यातला अजून न धुतलेला मळका कॉफीचा कप. त्यामुळे श्रोत्यांना आधी बरीच इमेल्स पाठवून पहिल्या रांगेत बसून तोंड उघडे टाकून घोरत न पडण्याच्या धमक्या आधीच दिलेल्या होत्या. गालावर हात टेकून विचारमग्न दिसत छोट्या पॉवर नॅप्स घेण्यात बरेच चाणाक्ष प्राणी यशस्वी झाले होते.

'सेल एक्पिरीयन्सेस, नॉट प्रॉडक्ट्स' हा मंत्र आपण वापरावा आणि प्रत्येक ठिकाणी वापरला जावा अशी अपेक्षा योहानेस डिक्लीचं प्रवचन जागं राहून ऐकलेले बरेच जण करत होते.हां, पण वेंकट सारखे करु नका.त्याने परवा त्याच्या फोनची कुरियर डिलीव्हरी द्यायला आलेल्या मुलीला 'तुम को कुद को प्रॉडक्ट सेलर्र नै, येक्सीपीरियन्स सेलर्र करके प्रोजेक्ट करके बेचना चैये' हे ऐकवले आणि ती कन्या वेगळेच काहीतरी समजून त्याचे दात पाडायला आपला करिझ्मावाला भाऊ घेऊन आली.त्याचे दात आणि करिझ्मा विराजमान बंधुराजांच्या ठोश्याची गाठ पडणं आम्ही त्याची वाक्यं मराठीत रिफ्रेज करुन वाचवलं म्हणून बरं!! अशाच काही 'सेलर्र' आणि 'यक्सपियरन्सेस' च्या या काल्पनीक विस्कळीत नोंदी..
गमॅझॉन.कॉमः
"अरे आता वाजलेत नऊ, वास्तुशांतीचे गुरुजी येणार उद्या सकाळी नऊला, सगळी दुकानं बंद असणार, कधी आणणार तू गोवर्या? दरवेळी आग लागल्यावरच विहीर खणायला कुदळ उचलणारेस का?" काकू त्यांचा 'वैतागलेला कंट्रोल्ड शांत' ठेवणीतला आवाज काढत म्हणाल्या.
"थांब गं तू, तो कुरियरवाला उद्या आठला डिलीव्हरी देतो म्हणालाय. कधी नव्हे ती आपल्याला गरज असताना गमॅझॉन वर काऊडंग केक वर ८% कॅश बॅक ची ऑफर आहे.पाच किलोची ऑर्डर दिलीय.म्हणजे किती स्वस्त पडलं बघ? नेक्स्ट टु नथिंग!"
"तुमचे ते केक फिक नंतर उद्याची पूजा झाल्यावर खा, आता आधी गुरुजी येण्या आधी गोवर्या वेळेत हजर कर म्हणजे झालं."आजींनी 'केक' शब्द ऐकून त्यांचं घोडं संभाषणात ढकललं.'काऊडंग केक' आणि खाणे ही जोडी मनात जमवून काकू तोंडावर हात दाबून पटकन बेसिन कडे पळाल्या.
आजी एखादाच जबरदस्त डायलॉग टाकून सगळ्यांना गार करण्याबद्दल प्रसिद्ध होत्या.त्यांना मागे एकदा हौसेने 'धडकन' पिक्चरला नेलं होतं तर मल्टिप्लेक्स मध्ये "आधी वेंधळ्यासारखं धाडकन पडायचं आणि त्याच्यावर पिक्चर कसले बनवायचे जळ्ळं" म्हणून त्यांनी आजूबाजूच्या पाच दहा जणांना धाडकन बेशुद्ध पाडायचं बाकी ठेवलं होतं.
"पण सत्या यार, खुळे सुगंधी आहे ना दहा मिनीटावर, जाऊन आणू ना पटकन!! असं सगळ्यांना आठ पर्यंत ऑक्सीजन वर का ठेवायचं?"
"खरं सांगू का, मला हल्ली खरी दुकानं, ते नाकावर आठ्या वाले दुकानदार, त्यांच्याकडून वस्तू घेणं, पैशाच्या नोटा देणं हे मनाला आवडतच नाहीये, मस्त ऑनलाईन ऑर्डर द्यायची, कार्ड ने पैसे भरायचे, दारात वस्तू हजर!!हे अमकं तमकं आहे का म्हणून तोंड उघडावं लागत नाही, पार्किंग शोधावं लागत नाही. या शॉपिंग अनुभवापुढे आता खरोखरची दुकानं नको वाटतात."
"आणि पाच किलो गोवर्या? पूर्ण सोसायटीची वास्तुशांती करायचीय का?"
"ठेवूया रे घरी, पुढच्या फंक्शन ला वापरता येईल."
काकूंच्या डोक्यात अजून 'ऑनलाईन गोवर्या' च्या धक्क्यापुढे 'पाच किलो गोवर्या' हा मुद्दा पोहचलेला दिसत नव्हता. मी त्या सगळ्यांना 'गोवरीयों की चाह मे नैना कुरियरवाले की राह मे' च्या हुरहूरीत सोडून चपला घालायला सुरुवात केली.

ब्लफर्स.कॉमः
"हॅलो मॅडम, मी ब्लफर्स.कॉम मधून बोलतोय, आपलं पार्सल घेऊन आलोय गेट वर, तुम्ही कंपनीच्या बाहेर या."
"अहो मी बस मध्ये आहे, मला अजून १५ मिनीटं लागतील पोहचायला." (संसारी किंवा पोरं बाळं असलेल्या बायका सव्वा नऊ ला हपिसात असतात का कधी? वेडाच्च आहे! सव्वा नऊ ला आलाय!)
"मॅडम पंधरा मिनीट मी नाही थांबू शकत, तुम्ही कोणाला तरी कलेक्ट करायला पाठवा खाली."(काय मूर्ख आहे!! ब्लफर्स.कॉम वर डिलीव्हरी टाईम ९ ते १२ काय हिच्या भूताने निवडलाय का?)
"अहो आता ऑफिसात कोणीच नाही, तुम्ही गेट वर द्या ना डिलीव्हरी" (मॅनेजर आहे जागेवर, त्याला गेट वर जाऊन भाजी पाला डिलीव्हरी घ्यायला सांगू??अजून इन्क्रिमेंटची मिटींग व्हायचीय कुरियर बाळा!!)
"कोणत्या गेट वर देऊ मॅडम?"
"तुम्ही कोणत्या गेट वर आहात?"
"माहिती नाही"
"समोर काय आहे? राखाडी बिल्डिंग समोर आहे का शेजारी?"
"राखाडी बिल्डिंग दिसत नाही मॅडम, माझ्या समोर फूटपाथ आहे आणि इलेक्ट्रिक चा खांब आहे"
"समोर फूटपाथ त्या तीन किलोमीटर रस्त्यावरच्या दहा बारा कंपन्यांना आहे, तुम्ही गेट वर विचारा कोणत्या गेट वर आहे ते"
"एक मिनीट हां" खर्र खर्र "हे कोणतं गेट आहे?"
"तुम्हाला कोणतं पाहिजे?"
"एक मिनीट हां" खर्र खर्र "मॅडम तुम्हाला कोणतं गेट पाहिजे?"
"मला गेट नकोय भाजी हवीय, त्या गेट वर या गेट चं नाव काय असा प्रश्न विचारा आणि मला उत्तर सांगा"
"थांबा हं" खर्र खर्र खर्र... "हां मॅडम कोंढाणा गेट वर आहे मी"
"ठिकाय कोंढाणा गेट वर सामान ठेवा"
खर्र खर्र खर्र खर्र खर्र...... "मॅडम गेट वाले नाही म्हणतायत, किंमती सामान जबाबदारी घेणार नाही म्हणतात"
"मला द्या मी बोलते" खर्र खर्र.. "अहो भाजीची डिलीव्हरी घ्या ना, मी बस मध्ये आहे, बस मधून दर स्टॉप ला दहा माणसं उतरतात वीस चढतायत,वेळ लागेल, भाजीत किंमती सामान काही नाही, पैसे आधीच दिलेले आहेत" (दहा माणसं उतरली.. वीस चढली.. बस ला पंधरा स्टॉप आहेत, ओळखा पाहू शेवटी बस मध्ये किती उरतील?)
"हां घेतो मॅडम, त्याने पिशवी नाही आणली" (सत्यानाश!!! आता कांदे बटाटे मेथी टॉमेटो रवा थालीपीठ भाजणी हातात घेऊन गेट वरुन जागेवर जावं लागणार!)
"असू दे, ओ थांबा थांबा बस पोहचली आपल्या स्टॉप वर, त्या माणसाला थांबवून ठेवा."
"मॅडम,जाता जाता आजूबाजूला का नाही घेत भाजी?"
"घरी जाईपर्यंत सूर्य मावळतो.पोटात कावळे कलकलत असतात.भाजीच्या दुकानात अशाच भाजी घेऊन घरी जाणार्यांची प्रचंड गर्दी असते.सुट्टे पैसे जवळ नसतात.इथे मोबाईल वरुन बसल्या बसल्या भाज्या, निवडलेल्या भाज्या,सॅलड ची ऑर्डर देता येते.मोठ्या ऑर्डरीवर डिस्काऊंट मिळतो.घरी गेल्या गेल्या भाज्या फोडणीला टाकता येतात.रोज ताज्या विकत घेता येतात.या अनुभवापुढे भाज्या ऑफिसातून घरी घेऊन जाण्याचा त्रास मला चालतो."

डायविथअस.कॉमः
"उदंड पैसा साठवा, मृत्यूला जमेल तितके परत पाठवा..
पण फायनली मरताना फक्त डायविथअस लाच आठवा!! "
असं अत्रंग स्लोगन वाचून माझी पावलं अडखळली आणि म्हटलं 'बघूया तरी काय आहे ते'
आत एक प्रशस्त जागा, टेबला पलिकडे एक माणूस होता. एक बाई डोळ्यात अश्रू आणून फोनवर बोलत होती. पलिकडे कोपर्यात एका खुर्चीवर एक झब्बा धारी माणूस व्हाईट बोर्ड वर हूरहूर, कुरकूर, सांजवेळ, हळुवार,अलवार, स्मृती, उन्नती, निर्वाण,आव्हान, स्मरण इ.इ. शब्दांची यादी होती तिथे काही शब्दांपुढे बरोबर च्या खुणा करत पेन तोंडात धरुन बसला होता.
"नमस्कार, डायविथ अस डॉट कॉम तर्फे मी मृत्यूंजय मारणे स्वागत करतो, आपली काय सेवा करु शकतो?"
"नक्की काय आहे हे?"
"आम्ही लोकांचा स्वतःच्या मरणाचा एक्स्पिरियन्स सुधारतो."
"म्हणजे, मॉर्फिन किंवा क्लोरोफॉर्म विकता का?"
"नाही नाही, आम्ही प्रॉडक्ट विकत नाही.एक्स्पिरियन्स विकतो."
"विमा विकता का? म्हणजे माणूस मेल्यावर त्याच्या घरच्यांना पैसे वगैरे?"
"हा खूपच कॉमन धंदा झाला.ते सगळं इतरांना करु दे.आम्ही त्याच्या पुढे आहोत."
"जरा नीट सांगा ना."
"म्हणजे बघा, तुम्ही एक दिवस मरता.सर्वांना दु:ख तर होतंच, पण त्याहीपलिकडे जाऊन काही प्रॅक्टिकल अडचणी असतात.डेथ सर्टिफिकेट मिळवणे, कागदोपत्री करणे, तुमचा चांगला फोटो मिळवणे, पेपरात शोकसंदेश देणे वगैरे.तुमच्याशी रिलेटेड लोक खूप दु:खात असतात.आमच्या स्किम मध्ये आम्ही फक्त महिन्याला २० रु. भरायला सांगतो.तुम्ही दोन तीन तुमचे जवळचे लोक नॉमिनी म्हणून कळवायचे.ते फक्त आमच्या लाईनीवर मिस्ड कॉल देतील आणि मग आम्ही आमचं काम चालू करु."
(आधी हा शहाणा 'तुम्ही मेल्यावर' वगैरे शब्द वापरुन माझ्या पोटात फुलपाखरं उडवत होता.अजून याच्या स्किम मध्ये पैसे भरले नाहीत तर हे असे शब्द! त्यात याचं असं आडनाव! यात काही ईश्वरी संकेत तर नसेल ना?)
मारणे साहेबांनी पुढे विवेचन चालू केले:
"तुम्ही अचानक मरता.पुरुष असाल तर दाढी वगैरे केलेली नसतेच, स्त्री असाल तर फेशियल आयब्रो हेअर कट वगैरे नुकताच केलेला नसतो. आयुष्यभर चकाचक टिपटॉप होऊनच लोकांना भेटायची सवय असलेल्या तुम्हाला मेल्यावर अनेक अनोळखी लोकांना अस्ताव्यस्त अवस्थेत भेटावं लागतं.त्यासाठी आमची मॉर्टीशियन सेवा आहे.मेल्यावर मिस्ड कॉल दिला की आधी डॉक्टर येतो आणि मेल्याची खात्री करुन डेथ सर्टिफिकेट हातात देतो. मग मॉर्टीशियन येतो आणि चेहरा, दाढी, हेअरकट, आयब्रो, स्त्रिया आणि पुरुष दोन्हींनी तसा चॉइस रजिस्टर करताना सांगितला असेल तर माफक अगदी दिसणार नाही असा मेक-अप करुन देतो. आमचे देह दान वाल्यांशी पण टाय अप आहे. तुम्ही फॉर्म वर जे दान करायचे लिहीलेले असेल त्याप्रमाणे ते न बोलावता येतात आणि त्यांना हवे असलेले अवयव काढून घेऊन जातात.आमचा एक प्रतिनीधी साईट वर २ दिवस हजर राहून आल्या गेल्यांना व्यवस्थित विषय काढून गप्पात बिझी ठेवतो."
"पण म्हणजे मी मरायची तुम्ही लोक वाट पाहणार..ही कल्पनाच भयंकर आणि अमानुष आहे."
(हा प्राणी सारखा 'तुम्ही मेल्यावर' 'तुम्ही मेल्यावर' करतोय..याला जरा सणकवायला हवाय.)
"आमच्याबद्दल असे गैर समज होणार ही कल्पना आहे. म्हणूनच तुम्ही रजिस्टर केल्यावर दहा वर्षात मेला नाहीत तर तुमची फी वीस ची महिना पंधरा रुपये होते. अजून दहा वर्षं मेला नाहीत तर दहा रुपये होते.अजून मेला नाहीत आणि डायविथस पण जिवंत असली तर पुढची सर्व वर्षं, आम्ही किंवा तुम्ही मरेपर्यंत, जे आधी होईल ते, तुम्हाला मासिक फी लागणार नाही.आणि मेंबर शिप आपोआप प्रीमीयम ला अपग्रेड होईल."
"प्रीमीयम मध्ये काय काय आहे?"
"कॉफीन सिम्युलेशन. म्हणजे तुम्ही आधीच कॉफीन निवडायची.तुमचा फोटो अपलोड केला की त्या कॉफीन मधे झोपल्यावर तुम्ही कसे दिसाल त्याचं सिम्युलेशन तयार होईल, रंग, मटेरियल चे निरनिराळे प्रकार ट्राय करुन तुम्हाला ठरवता येईल कोणत्या स्टाईल चं कॉफिन तुमच्या चेहर्याला सूट होईल.अन्य धर्मीयांसाठी कॉफीन ऐवजी कफन सिम्युलेशन.म्हणजे तुम्हाला सूट होईल असं आधीच निवडून ठेवता येईल.कबरीच्या दगडावर लिहायला चांगल्या शब्दांच्या इंग्लिश ओळी बनवण्यासाठी आम्ही टिव्ही न्युज चॅनेल वरुन मुलाखत्ये पार्ट टाईम भाड्याने घेतलेत.शिवाय इंग्लिश पेपर मधले अग्रलेख वाले पण आहेत. एपिटाफ सर्व्हिस ऐवजी अन्य धर्मीयांना गृह्य संस्कार सर्व्हिस आहे. म्हणजे इमॅजिन तुम्ही मेलात आणि तुमचा पेपरात शोक संदेश काहीतरी पकाऊ ओळी लिहून छापून आला आहे-
"आबा का गेलात तुम्ही फॉरेव्हर...
हार्ट बीपीने ऑर व्हॉटेव्हर..
आठवतो तुम्हाला पाह्तो सिरीयल व्हेनेव्हर..
सभेला सगळे या जवळचे व्हूएव्हर.."
आता ही अशी ऑबिच्युअरी वाचून तुमच्या आत्म्याला 'हाय भगवान! ये देखने से पहले मै मर क्यों नही गया' असं वाटेल की नाही? आम्ही यासाठी पार्ट टाईम मराठी गझलाकार ठेवले आहेत.ते अत्यंत सुंदर गझला रचून ठेवतात आणि तुमचा शोकसंदेश त्या ओळींसह आम्हीच छापून आणतो."
(मला मारणे साठीच रजिस्टर करायची आणि लगेच व्हाईट बोर्ड वाल्या गझलाकाराचे काम पडेल अशी परिस्थिती आणण्याची तीव्र इच्छा होत होती.)
"आणि आम्ही फक्त स्वतःच्या मरणासाठीच रजिस्टर करायचा नियम ठेवला आहे. तुम्हाला दुसर्या कोणासाठी फी भरता आणि रजिस्टर करता येत नाही.ही सुविधा पण आधी होती.पण 'मेल्यांनो आमच्या मरणासाठी आमच्या पोरांना रजिस्टर करायला लावता, आता रोज वाट बघत बसलेत' म्हणून वृद्धांचा मोर्चा आला.त्यांनी बरीच तोडफोड केली तेव्हापासून फक्त सेल्फ रजिस्टर करता येतं. मग, तुम्ही आता घेताय का लगेच मेंबर शिप?"

शेकमायट्रिप, गोमायजिजो, फेक्स्पिडीयॉ(फेक्स्पीडीयॉ............बूम बूम),लुकिंग.कॉम आणि अन्य
"आता परत कुठे निघालायस की काय? मागच्याच महिन्यात जाऊन आलात ना तुम्ही फिरायला?"
"हो,पण शेकमायट्रिप वर अजून दोन बुकिंग केली की २ रात्री तीन दिवस फ्री आहे चेरापुंजी ला जुलै-ऑगस्ट मध्ये.चांगली फुकटची ट्रिप मिळतेय दोनच बुकिंग नंतर तर का सोडायची?"
"चेरापुंजी? जुलै ऑगस्ट? मागच्या वर्षी असाच ऑफर आहे म्हणून नागपूर ला मे मध्ये गेलास आणि आल्यावर आजारी पडलास."
"अगं थोडं कमी जास्त होतच राहतं!! त्या ट्रिप साठी मला ५०% डिस्काऊंट मिळाला, शेकमाय ट्रिप वर तिकीट काढल्यावर तिथे पॉईंट जमा झाले, तिकीटाचे पैसे क्रेडिट कार्ड ने भरले, त्याचे भरपूर पॉईंट जमा झाले.मग क्रेडिट कार्ड चे पैसे भरताना डेबिट कार्ड ने भरले, त्याचे पॉईंट जमा झाले. असे सगळीकडच्या पॉईंट च्या घरात वस्तू आल्या, नॅपकीन, गप्पर वेअर चा डबा, कानाला लावायला ब्ल्युटूथ.म्हणजे बघ, आपण आपल्यासाठी काहीतरी घ्यायचं, मजा करायची, पॉइंट जमले की आपल्यालाच काहीतरी मिळणार, ते बाप चा बाप चा बाप वाले तर नुसतं मोबाईल अॅप मोबाईल वर टाकलं की घड्याळ देऊन टाकतात.आमचा एक फुकट्या मित्र सगळ्या गोष्टी फुकटच मिळवतो नीट ऑफर बघून आणि वेगवेगळी मोबाईल अॅप टाकून आणि काढून आणि हे सगळं मी काय माझ्यासाठी करतोय? तुझ्यासाठीच करतोय का? बाप चा बाप चा बाप वाले १ लाख पॉईंट जमले की आय फोन देणार आहेत, तो तुलाच देणार आहे ना मी?"
"अरे बाबा, १०० पैशामागे एक पॉईंट मिळवायचा म्हणजे आधी १०० खर्च पण होतात ना?"
"हे आमचं या काळातलं गणित आहे. तू नाही का, वेगवेगळ्या तीन चार भिश्या लावायचीस, आणि एका भिशीतून माझी शाळेची फी, दुसरीतून तुला दिवाळीला छोटा दागिना, तिसरीतून घरात वर्षाला एक फर्निचर घ्यायचीस?त्यावेळी 'आपलेच पैसे आपल्याला परत मिळतात' हे माहिती असून पण तुला ते फायद्यात पडायचंच ना? आमची पण तशीच मॅनेजमेंट आहे."

डुबाँग.कॉम आणि अन्यः
"मला वेज हिल ची सँडल दाखवा."
"त्या तिथे आहेत बघा."
"इतक्याच आहेत? मला आमसूली रंगाचा सोल आणि चिंतामणी रंगाचे स्ट्रॅप वाली दीड इंच हील असलेली आणि काळा वेलक्रो वाला पट्टा असलेली सँडल हवी होती."
"अहो मॅडम, सँडल आहे ती..मॅचिंग ब्लाऊज पीस नाही."
"मॅचिंग ब्लाऊज पीस चा जमाना गेला हो! आता प्लेन साडी, त्यावर एकदम ढंचॅक डिझाईनचा एकही कलर मॅच न होणारा मल्टीकलर्ड ब्लाऊज, मल्टीकलर्ड बॅग आणि साडीतले दोन तीन रंग एकदम नीट मॅच होतील अशा फूट वेअर ची फॅशन आहे."
"दहा दुकानं बघून या आणि मला सांगा तुम्हाला कुठे अशी सँडल मिळतेय का."
"डुबाँग किंवा क्रॅप्डील किंवा फ्लॉपकार्ट किंवा डाईमरोड.कॉम वर मिळेलच मला."

"काय गं तुम्ही सारख्या ऑनलाईन शॉपिंग करत असता?७०% ऑफ देऊन १२०० चा कुर्ता ५०० ला विकतात, तो असतो मूळचा ४०० चा.परवाच तुला ऑफर मधला कुर्ता आणि मी मार्केट मधून घेतलेला कुर्ता दोन्हीचे फोटो दाखवले ना मी?तुम्हाला कपडा कसा आहे, शिवण कशी आहे हात लावून बघता तरी येतं का ऑनलाईन शॉपिंग मध्ये?"
रोहीणी जरा वैतागून म्हणाली. तिचं वैतागणं रास्त होतं. रोहीणीने स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर असताना मोठा सासरचा धंदा उघडतोय म्हणून कपडे विक्री, कुठे काय चांगलं टिकाऊ मिळेल, कुठे काय चांगलं खपेल याचा नीट अभ्यास करुन कपड्यांचं दुकान टाकलं आहे. ते चांगलं चालू पण आहे. पण आमच्यासारखे 'खडूस दुकानदार के मारे' पोळलेले लोक थोडे जास्त पैसे देऊन पण डुबाँग क्रॅपडिल फ्लॉपकार्ट डाईमरोड या सायटींची दुकानं चालवत असतात.स्वतःकडे नसलेली वस्तू "या जगात अस्तित्वात नाही,बंद झाली,अत्यंत जुनाट आहे, तुम्हाला सूट होणार नाही" हे सांगण्याचा बाणा घेऊन आलेले दुकानदार बरेचदा दुकानं फिरायची वेळ तरी आणतात किंवा आग्रह करकरुन कपाट वेगळ्याच कपड्यांनी भरायची तरी.
"आता लो राइज चीच फॅशन आहे मॅडम, हाय आणि मिड राइज कोणीच घालत नाही.भारतात कुठेच मिळत नाही.हाय राइज जेगिंग मिळतील ते डेनिम सारख्या कॉटन चे आहेत." आमच्यासारख्या मफिन टॉपीय लोकांना लो आणि मिड राइझ साध्या टॉपांवर घालण्याच्या नामुष्कीपासून आणि बाकी लोकांना ते डोळ्यांनी पाहण्याच्या अत्याचारापासून क्लिपकार्ट ने वाचवलं..त्यावर एका सेलर च्या खर्याखुर्या डेनिम च्या हाय राइझ जीन्स होत्या. 'हाय राइझ' 'जीन्स' असा फिल्टर लावून त्या सापडल्या. अंतर्वस्त्रांच्या आणि बरोबर बाकी जनरल कपडे विकणार्या बर्यापैकी मिक्स गर्दी असलेल्या दुकानात जाऊन साईझ मागितल्यावर दुसर्या मजल्यावरच्या नोकराला ओरडून "ए यांना अमुक तमुक सी काढून दाखव रे!!!" सांगून मागणारीला सीता बनून धरणीमातेत गडप्प व्हायची वेळ हल्ली स्त्री विक्रेत्या असल्याने येत नसली तरी पूर्वी बरेचदा यायची.त्यावेळी गिवामी.कॉम असती तर गुपचूप आईला एकटीला पाठवून अंदाजपंचे एखादा जुळणार्या साईझ वाला नग आणायला सांगून तो वर्षानुवर्षं वापरायची वेळ आली नसती.
"कुर्ता पाहिजे, इतका लाँग नकोय हो,प्रिंटेड नकोय, थोड्या कॉटन मिक्स मटेरियल चा पाहिजे, पूर्ण कॉटन नको, स्लीव्ह कॅप नको, हाफ पाहिजेत, चायनीज किंवा स्लिट नेक नकोय..साईड कट इतके मोठे नकोत, हा चांगला आहे, अर्र इतका महाग नकोय, ५००-१२०० रेंज मध्ये दाखवा" हा आणि असा दुसर्या मागण्यांचा निबंध दुकानदाराला बोलून त्याला ते गुलबकावलीच्या फुलासमान दुर्मीळ प्रॉडक्ट ढिगातून क्षणात काढून दाखवता यावे अशी अपेक्षा असलेल्या सुंदर्या त्या काळातही होत्या, या काळातही आहेत, भविष्यकाळात "ओ या व्हॅक्यूम सूट मध्ये डार्क फ्युशिया किंवा पिकॉक ब्लूइश ग्रीन शेड नाही का, ऑक्सीजन सिलींडर चा आकार जरा राऊंडेड दाखवा, झिपर छोटी असलेला दाखवा, मला याच सूट मध्ये थोडे आल्टर करुन नेक जरा ट्युलिप पेटल शेप करुन द्या,या सूट मध्ये जरा पातळ फॅब्रिक चा नाही का" असा कलकलाट अगम्य इन्फ्रारेड किंवा इतर लहरी पाठवून करणार्या रमणीही असतील. सध्या तरी अस्तित्वात असलेल्या रमणींना नाकावर आठ्या देऊन किंवा दीर्घ श्वास घेऊन घाबरत तोंड देणार्या दुकानदारांबरोबरच 'स्लीव्ह टाईप' 'फॅब्रिक' 'ऑकेझन' 'कलर' 'लेंग्थ' 'ब्रँड' 'बजेट' अशी फिल्टर एकाचवेळी मारुन ढिगार्यातून हवे ते १००-२०० कपडे काढून देणार्या डुबाँग क्रॅपडिल फ्लॉपकार्ट डाईमरोड पॉपक्ल्यूज गपमी.कॉम सारख्या सायटी आहेत हा एक्सपीरियन्स मानवी चमत्कारच नाही का?

(समाप्त)
2 comments:
hahahaha mast
khup chaan...mast
Post a Comment