या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Wednesday 10 September 2014

नुकतेच वैर झाले

आयुष्य बोर झाले, मन सैरभैर झाले
माझे आता स्वतःशी, नुकतेच वैर झाले

खा जैन पावभाजी, कांदे महाग झाले
पोटे अजून खपाटी, जाडे कुबेर झाले

खुपती तना मनाला, वैफल्यरुप भाले
जखमा कश्या भराव्या, दुर्मीळ वैद्य झाले

न्यावी सदा दुचाकी, फसतात कारवाले
कोंडीत वाहतूकीच्या, सारेच दीन झाले

कामे किती कशी मी, बनवू घरी मसाले
सुगरण 'अनु' कधी मी, कौशल्यहीन झाले ||

2 comments:

Nandan said...

'हझल' आवडली :)

Unknown said...

खूप छान ☺