या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Tuesday 6 November 2007

ग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय!

९८९००९८९००..(दाबला.)
'वेलकम टु एअरटेल कस्टमर सर्व्हिस. प्रेस १ फॉर इंग्लिश, २ फॉर हिंदी, ३ फॉर मराठी'
३ (दाबला.)
'प्रीपेड माहिती साठी १ दाबा, रिचार्ज साठी २ दाबा, नवीन कार्ड च्या माहितीसाठी ३ दाबा.'
१ (दाबला.)
'अकाउंट बॅलन्स च्या माहितीसाठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा'
१ (दाबला.)
'ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा.'
....(काहीच नाही दाबले. काय दाबावे कळले नाही. 'वॉइस रिस्पॉन्स लावणार्‍याचा गळा दाबण्यासाठी ४ दाबा' असे पुढे आहे काय हो?)
'तुम्ही दाबलेला नंबर योग्य नाही.ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा, कॉल चालू असताना मागच्या मेनुकडे जाण्यासाठी ७ दाबा, कस्टमर सर्व्हिस शी बोलण्यासाठी ९ दाबा.'
९. (दाबला.आता नंबर दाबून दाबून मेंदूला थकवा आला आहे.)
'हॅलो वेलकम टु एअरटेल. हाउ कॅन आय हेल्प यु?'
(अरे चांडाळा,मराठीसाठी इतके आकडे मूर्ख म्हणून दाबले का लेका मी?)
'डु यु नो मराठी?'
'नो मॅम, आय कॅन ओन्ली अंडरस्टँड लिटल बिट ऑफ इट.कान्ट स्पीक.'
(अरे फुल्या फुल्या फुल्या, चुल्लूभर पानीमे डूब मर! मला इंग्रजी कामापुरती येत असली तरी इंग्रजीत कचाकचा भांडता येत नाही ना रे.त्याला मातृभाषाच बरी.'ओ, काय सर्व्हिस देता का झx मारता?' चा आवेश आंग्लभाषेत आणता येणारे का मला?)

पुढचा संवाद आंग्लभाषेतलाच,पण मूळ भांडणाची नीट मजा मिळावी म्हणून मराठीत देत आहे.
'मी अमुक तमुक, नंबर अमुक तमुक.मला आताच एस एम एस आला की मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस दिल्याबद्दल आम्ही तुमच्या शिलकीतून १५ रु. कापून घेत आहोत.'
'थांबा मॅडम, मी चेक करतो, होल्ड ऑन.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो'
(परत 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन')
'हॅलो'
'यस मॅम, आम्ही शोधले. ती सर्व्हिस रिक्वेस्ट तुम्हीच दिली आहे.'
'मी एअरटेल प्रीपेड घेतल्यापासूनच्या तीन वर्षात कधीही अशी सर्व्हिस रिक्वेस्ट दिलेली नाही.'
'पण आमची सिस्टम म्हणते की तुम्ही तशी रिक्वेस्ट दिली.'
(च्या xxx ! तुझी सिस्टम घाल चुलीत मेल्या.)
'अहो पण मी तशी रिक्वेस्ट कधीच नाही केली, तसा फोन नाही केला, अशी सर्व्हिस हवी का विचारण्यार्‍या फोनला हो उत्तर नाही दिले, आणि असा एस एम एस नाही केला, आणि अशा एस एम एस ला उत्तरही नाही दिले.'
(मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले टाकली नाहीत, मी ती उचलणार नाही.)
'हे बघा मॅडम, आमच्या सिस्टम मधे स्पष्ट दिसतं आहे की तुम्ही अशी रिक्वेस्ट केली होती.'
'मी पण स्पष्ट सांगते आहे की मी अशी रिक्वेस्ट कधीच नाही केली. ही तुमच्या सिस्टमची चूक आहे.'
'हे पहा मॅडम, याबाबतीत मी काहीच करु शकत नाही.'
'तुम्ही म्हणता ना मी रिक्वेस्ट दिली, मग ती कोणत्या तारखेला आणि कोणत्या स्वरुपात दिली याची माहिती द्या.'
'सॉरी मॅडम, ही माहिती आम्ही डिसक्लोज करु शकत नाही.'
(अरे चोरा! आमची माहिती बरी विचारुन घेतोस फोन केल्या केल्या..आणि स्वतः माहिती देताना मात्र प्रायव्हसी पॉलीसी होय?)
'हे बघा, मी स्पष्ट सांगते आहे की अशी सर्व्हिस मी कधीच मागितली नाही आणि ती रद्द करा.आणि मला १५ रु. परत द्या.'
'सॉरी मॅडम. १५ रु. तर परत मिळणार नाहीत.तुम्ही ५११ ला 'एम सी ए कॅन्सल' असा एस एम एस करुन कॅन्सल ची रिक्वेस्ट टाका.'
(वा हे बरं आहे. तुम्ही नको त्या सर्व्हिस न विचारता द्या..रद्द करताना मात्र आम्हालाच तसदी द्या.तुम्ही कचरा करा, आम्ही झाडू मारतो.)
'नक्की रद्द होईल का?'
'असं करा मॅडम, तुम्ही चोवीस तासांनी परत फोन करुन ती कॅन्सल झाल्याचं कन्फर्मेशन घ्या.'
(घेते रे..करते काय न घेऊन?पैसे माझेच जाणार ना दर महिन्याला? चूक माझी नसली तरी मला ती सुधारायला तडफडायला पाहिजेच.)
एम सी ए कॅन्सल..५११..सेंड.
'युवर रिक्वेस्ट विल बी प्रोसेस्ड इन नेक्स्ट ट्वेंटी फोर अवर्स.'
(अय्या! कित्ती छान! खरंच ना पण?)

२४ तासांनी.
९८९००९८९००..(दाबला.)
'वेलकम टु एअरटेल कस्टमर सर्व्हिस. प्रेस १ फॉर इंग्लिश, २ फॉर हिंदी, ३ फॉर मराठी'
३ (दाबला.)
'प्रीपेड माहिती साठी १ दाबा, रिचार्ज साठी २ दाबा, नवीन कार्ड च्या माहितीसाठी ३ दाबा.'
१ (दाबला.)
'अकाउंट बॅलन्स च्या माहितीसाठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा'
१ (दाबला.)
'ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा.'
....(काहीच नाही दाबले. काय दाबावे कळले नाही. 'वॉइस रिस्पॉन्स लावणार्‍याचा गळा दाबण्यासाठी ४ दाबा' असे पुढे आहे काय हो?)
'तुम्ही दाबलेला नंबर योग्य नाही.ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा, कॉल चालू असताना मागच्या मेनुकडे जाण्यासाठी ७ दाबा, कस्टमर सर्व्हिस शी बोलण्यासाठी ९ दाबा.'
९. (दाबला.)
'हॅलो.'
'मी असा असा एम सी ए कॅन्सल चा एस एम एस केला. आणि मिस्ड कॉल ऍलर्ट सेवा खरंच कॅन्सल झालीय का?'
'थांबा हं मॅडम. मी चेक करते.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो मॅडम, ती सर्व्हिस अजून तरी कॅन्सल झालेली नाही, पण चोवीस तासात नक्की कॅन्सल होईल.'
'नक्की होईल का? की चोवीस तासांनी परत हेच म्हणणार?'
'नही, तुम्ही कॅन्सल रिक्वेस्ट टाकली आहे ना? नक्की कॅन्सल होईल.'

दुसरा महिना:
'रुपीज १५ डिडक्टेड फ्रॉम युवर अकाउंट. थँक यु फॉर युजिंग एअरटेल मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस.'
९८९००९८९००..
ब्लाब्लाब्ला..१ दाबा..२ दाबा..३ दाबा..
'हॅलो, मी अमुक तमुक, नंबर अमुक तमुक. मी मागच्या महिन्यात मिस्ड कॉल सर्व्हिस कॅन्सल चा एस एम एस केला होता आणि तुमच्या ग्राहक सेवेला फोन पण केला होता. त्यांनी सांगितले की ती रद्द होईल पण झाली नाही. या महिन्यात परत १५ रु.गेले.'
'थांबा हं मॅडम.मी चेक करतो.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो मॅडम, तुम्ही परत एकदा एस एम एस करा.'
'पण यावेळी नक्की रद्द होईल ना? आणि मागच्या वेळी रद्द होईल असे छातीठोकपणे सांगणारी तुमची प्रतीनिधी आता कुठे आहे?'
'आता हे काही मी सांगू शकत नाही.पण तुम्ही ५११ ला एस एम एस करा आणि चोवीस तासांनी एकदा फोन करा.'
परत एकदा एम सी ए कॅन्सल..

तिसरा महिना:
'१५ रु गेले आणि मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस वापरल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.'
(का? का? माझ्याच बाबतीत असं का?)
९८९००९८९००
'१ दाबा..२ दाबा..३ दाबा..७ दाबा..९ दाबा..'
'हॅलो ब्ला ब्ला ब्ला.फोन केला होता...ब्ला ब्ला ब्ला... अजून कॅन्सल झाली नाही. तुमचे लोक काय करतात? आणि एस एम एस करण्याशिवाय रद्द करण्याचा दुसरा मार्ग नाही का? आणि रद्द झाल्याचा किंवा न झाल्याचा एस एम एस का येत नाही? युवर रिक्वेस्ट विल बी प्रोसेस्ड विदीन २४ अवर्स असा एस एम एस दर महिन्याला येऊनही काहीच का होत नाही? असं किती महिने चालणार?प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी मला '२४ तासात नक्की रद्द होणार बघा' असं सांगून कटवणार.'
'हे पहा मॅडम. मागच्या महिन्यात तुम्हाला कोणी अटेंड केलं आणि काय सांगितलं ते मला माहिती नाही.'
'बाई निशा होती आणि पहिल्या वेळी अटेंड करणारा बाबा आसिफ होता'
'बरं. यावेळी तुम्ही एस एम एस करा. नक्की कॅन्सल होईल.'
यावेळी वैतागात बदल म्हणून कस्टमर सर्व्हिस ला ई पत्र पाठवले.
यांत्रिक उत्तरः 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.'
(ऑटो रिप्लाय..पलिकडचा माणूस इमेल वाचत नसला तरी त्याच्याकडून प्रोग्रामने पाठवलेले उत्तर मिळणार. 'एअरटेलकडून मला स्पर्धेत ताजमहाल बक्षिस मिळालाय. बक्षिस घ्यायला कधी येऊ?' म्हटले तरी 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.' उत्तर आणि 'हराxxx! हे मेल जो वाचेल त्याच्या नानाची टांग! मर मेल्या!' म्हटले तरी 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.'. उत्तर पाठवणार्‍या प्रोग्रामला तुमच्या अडचणींशी, आनंदाशी, दु:खाशी काही सोयरसुतक नाही.शिव्या दिल्या तर रागही नाही.आणि आतापर्यंत पाठवलेल्या ३ ईपत्रांना ऑटो रिप्लाय नंतर मानवी रिप्लायही नाही.ईपत्रे आपोआप 'स्पॅम फोल्डर' मध्ये पण जात असावीत एखाद्या प्रोग्रामने.हाय काय नि नाय काय! कोण तो वेडा सारखा तक्रारीची ईमेल करतोय? घर थंडीत बांधा रे त्याचं! यालाच 'विज्ञान: एक शाप' म्हणत असावेत काय?)

६ वा महिना..
'ब्ला ब्ला ब्ला..१५ रु गेले..कॅन्सल नाही झाली...'
'बरं. तुम्ही असं करा, यावेळी एम सी ए नो पाठवून बघा.'
एम सी ए नो.. ५११..
'हॅलो..ब्ला ब्ला..ब्ला..नाही झाले कॅन्सल..मेसेज फेल.'
'हे कोणी सांगितले? तुम्ही एम सी कॅन्सलच पाठवा.'
एम सी ए कॅन्सल.. ५११.. एमसीएकॅन्सल..५११..' 'एम सी ए नो'.. एमसीएनो..५११..२४ तासात रिक्वेस्ट प्रोसेस केली जाईल..'
'नक्की कॅन्सल होईल मॅडम.'
(कोण निर्बुद्ध xxxx गणंग घेतले आहेत रे कस्टमर सर्व्हिस मध्ये? दरवेळी 'अगदी नक्की' वाली आश्वासने देतात..दरवेळी काही करत नाहीत. मार्चमध्ये निशाशी बोलले, एप्रिल मध्ये आसिफशी बोलले,मे मध्ये सुरेशशी बोलले, जून मध्ये सिम्रनशी बोलले, आता अजून कोणकोण आहात ते या फोनवर. बोलून घ्या माझ्याशी.कॉल सेंटर मध्ये अमेरिकेतल्या माणसाशी मकरंदला मॅक होऊन आणि सविताला सॅली होऊन बोलावे लागते तसा कोणी विदेशी आयझॅक माझ्याशी आसिफ बनून बोलत नाहीये ना? का दरवेळी एकच आसिफ आणि एकच निशा वेगवेगळी माणसं बनून बोलत आहात?)

हा किस्सा गेले ७ महिना चालू आहे. दरवेळी 'एम सी ए कॅन्सल', 'एम सी ए नो' टु ५११..'नक्की रद्द होणार' ची आश्वासने.. 'कस्टमर सर्व्हिस' 'कस्टमर केअर' या गोंडस नावाखाली वावरणार्‍या या निर्बुद्ध अज्ञाताशी लढा देताना अस्मादिकांच्या तलवारी बोथट झाल्या आहेत. 'ग्राहक मंच' इ. माहित्या वाचून 'काही तरी केलं पाहिजे बुवा!' अशी स्फूर्ती येऊन दुसर्‍या क्षणी 'नको बाबा कोर्टाची पायरी!' म्हणून कच खाणे. 'काय बावळट आहेस. आयडीया सिमकार्ड घे.' ला 'मला फोन नंबर शक्यतो बदलायचा नाही' हे उत्तर, 'शंकरशेट रोड ला व्हेगा सेंटर ला जाऊन झापून या' वर 'व्हेगा सेंटर मध्ये जाऊन काचा फोडण्याची' स्वप्ने पाहणे, परत 'कस्टमर सर्व्हिस चे फोन व्हेगा सेंटरहून येतात की दुसरी कडून की बंगलोर की चेन्नईहून?' या अज्ञात शत्रूच्या ठिकाणाबाबतच्या शंकेने तलवारी गळून पडणे..
'जाऊदे मेलं. १५ गुणिले १२ म्हणजे १८० रु. जाऊदेत. पण हा दर वेळी मनस्ताप नको. हे पॅकेज संपल्यावर सरळ पोस्टपेड करुन टाकू नंबर तोच ठेवून.' असा भेकड विचार..
माझ्याकडे काय पुरावा आहे? ही माणसे 'मीच रिक्वेस्ट दिली' म्हणतात. मी कधीही कोणत्याही स्वरुपात दिली नाही हे मला माहिती आहे. पण माझ्याकडे मी ती दिली नाही याचे काय पुरावे आहेत? त्यांच्याकडे मी दिली याची काय पुरावे आहेत? असले तर सांगत का नाहियेत? हा काही स्कॅम आहे का? यात पूर्ण एअरटेल आणि एअरटेल ची डाटाबेस सिस्टम सामिल आहे का? दाद मागू कुठे? हे लचांड माझ्या मागे का लागावे? आता हे निस्तरायला कोणाला पकडावे? हे चोर एस एम एस पाठवूनही काहीच करत नाहीत हे कोणाला सांगावे?

'बसल्या जागी फोन करुन कामे होतात' हे सुख देणार्‍या ग्राहक सेवा खरंच सेवा आहेत का? काम नाही झाले तर प्रत्यक्ष अद्वातद्वा वचने देणार्‍या माणसांचे गळे पकडता येत नाहीत हा तोटा नाही का? समोरचा माणूस प्रत्येक वेळी वेगवेगळा असल्याने चुकीची माहिती देणार्‍याला ओळखता येत नाही हा तोटा नाही का? दरवेळी ऐकणारा माणूस वेगळा असल्याने आपले पूर्ण चर्‍हाट परत ऐकवावे लागणे हा तोटा नाही काय? 'बिचारे शिफ्ट मध्ये काम करणारे कॉल सेंटरवाले' अशी आश्वासने ड्रगच्या धुंदीत देऊन विसरुन जात असावेत का? पण सगळ्या ग्राहक सेवा अशा नसतात. सगळ्याच कॉल सेंटरमध्ये अनाचार चालत नाहीत..त्यांच्या आपल्या समस्या असतात..पण मग मला दर महिन्याला खोटखोटं सांगून पुढच्या महिन्यात १५ रु. जाईपर्यंत स्वस्थ का बसवतात?

कितीही सकारात्मक विचार करायचा म्हटलं तरी बरेचदा 'बाय हुक ऑर क्रुक' ने मोठे होणार्‍या या मोबाईल कंपन्यांबद्दल थोडी शंका येतेच. 'फटिचर, तू इतना सोचता क्यूं है रे?' असं म्हणून स्वतःला गप्प बसवते झालं.

(हा फक्त एक अनुभव आहे.'साहित्य' वगैरे नाही.त्यामुळे यात साहित्यिक मूल्ये दिसणार नाहीत.कोण रे ते 'कधी दिसली होती आधी तरी' म्हणतंय?आंग्लभाषेचा जास्त प्रभाव किंवा काही आक्षेपार्ह शिव्या आढळण्याची शक्यता.शुद्धलेखनाबाबत चुभूदेघे.)

17 comments:

Meghana Bhuskute said...

hihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihihiihihihihihihi!

Dhananjay said...

I had similar experience 2 years back when I was working in Pune. But I could not tolerate such things and discontinued the connection

Anonymous said...

हसु नाही आलं अजिबात...उलट चिडचिड झाली वाचुन!

मी पण कधी postpaid वापरलं नाही. बहुदा prepaid वाल्यांनाच असले अनुभव येतात. आम्ही ३००चं recharge करुन महीनाभर पुरवायचे plans करायचे आणी ह्या नालायक लोकांनी दर महिन्याला नविन स्किम्स आणुन पैसे deduct करायचे...बरं activate हे करणार आणि cancel करायला आपण दहा वेळा customer care ला कॉल करा! :-(

त्यात पण कॉल केल्यावर call center मधले सगळ्यात बिनडोक लोक आपला कॉल घेणार...कॉल संपल्यावर आपण मनातल्या मनात खुप शिव्या देणार आणि तरीही तिच सर्व्हिस कंटिन्यु करणार...

माझी दुनिया said...

टिनु,
प्रिपेड वाल्यांनाच असे अनुभव येतात हा निव्वळ गैरसमज आहे.माझे बिपीएल चे पोस्टपेड कनेक्शन होते. त्यातही मला असे अनुभव वारंवार यायचे.
पण चार्ज केलेले पैसे नंतर बिलात कळायचे. सुरूवातीला मी इमानदारीत येईल ते बिल भरायचे.
मग शेवटी सरळ बिपीएल चे कनेक्शन कट करून दुसरे घ्यायचे ठरवले.शेवटचे बिल भरताना मात्र मी याचे सगळॆ उट्टे काढले आणि जेवढे वापरले तेवढे च भरले.मी नेमके काय काय भरले याचा माझ्याकडे रेकॉर्ड ठेवला. ड्यु डेट उलटल्यावर त्यांचे मला फोन वर फोन यायला लागले.
मी सुध्दा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तिंना माझ्या परीने समजावले, प्रसंगी त्यांना मी सांगितलेले त्यांच्याकडे नोंदवून ठेवायला सांगितले, जेणेकरून मला मी कुणाचे तरी पैसे नाहक बुडवते आहे असा त्यांचा गैरसमज होऊ नये.
शेवटी मात्र असह्य होऊन मी त्यांच्या रीड्रेसल ऑफीसर आणि नोडल ऑफीसर ला इमेल पाठवला.
सगळी इंत्यभूत हकीकत कळवली. आणि त्यांनाच मी दोषी आहे का म्हणून विचारले. त्यांना पाठवलेल्या इमेलमध्ये सगळी कर्मकहाणी माझ्याकडे असलेल्या पुराव्यांसकट लिहीली.
गंमत म्हणजे यावर त्यांचाच; ते मला १५०/- देणं असल्याचा आणि आम्ही ते ४५ दिवसात पाठवत असल्याचा इमेल आला. :-D
अर्थातच मला त्यांना देणे नसल्याचे त्यांनी कबूल केल्याने मी त्या मेलला प्रत्युत्तर ही केले नाही अथवा त्या १५०/- करता पाठपुरावा सुध्द्दा केला नाही.
त्यामुळेच ४५ दिवसात खात्रीलायक येणारा परतावा आज ११ महिने होत आले तरी आलेला नाही. :-)
मात्र येणारे फोन त्यांच्याकडून बंद झाले.

अनु,
बाकी स्वानुभव असल्याने आणि त्यातून तारून गेल्याने लेखाचा निखळ आनंद घेता आला.
पण मी तुझ्या (तुमच्या) दु:खात सहभागी आहे.

priyadarshan said...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

a Sane man said...

aamhi aapalya dukhkhat sahabhagi aahot...

tu desi mi desi mahit asun ugich na jamaNara american accent zaDaNare moorkha customer care wale lok ni te madhe madhe peeDaNare irritating sangeet... :(

TheKing said...

त्या एयरटेलवाल्यांच्या नानाची टांग!

या मंडळींशी बोलताना मी नेहमीच ’रात्रंदिन आम्हा युद्धप्रसंग’असा पवित्रा घेतो, मग जिंकण्याची शक्यता शंभर टक्के!

पण केवळ शक्यताच हो, कारण असले असंख्य उद्योग करुनच ही मंडळी श्रीमंत झाली आहेत.

सर्किट said...

sympathies.. :(

navin baatami aikalee ki metros madhye number same thevun provider change karata yeil. tyane tumachi du:khe kami hovo hi sadichchhaa.

ओहित म्हणे said...

हा हा ... मला वाटायचं मीच दुर्भागी आहे!! ;)

Anonymous said...

हाय अनु,
तुम्ही खूपच छान लिहिता. हा ललित लेख सुद्धा मस्त जमुन आलाय. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा!

Udayan said...

छान खुप छान आनंद वाटला वाचून की कोणी तरी एवठ्या मोठ्या कंपनी बद्दल लिहू शकत हे वाचून फार छान वाटल। हे खूप ग्राहकां बद्दल होत पण कोणी हे सांगत नाही। धन्‍यवाद धन्‍यवाद खूप खूप धन्‍यवाद आपला एक मराठी मित्र उदयन

आल्हाद said...

वैताग येतो ना नुसता...!!!
गेल्याच्या गेल्याच्या गेल्या आठवड्यात "an Idea can change your wife and so life" वाल्यांनी माझं incoming बंद केलं.
.. दुष्टात्मे :(
गम्मत म्हणजे माझा फोन Switched off आहे अस मला फोन करणार्‍यांना मेसेज येत होता, अगदी मी स्वतःला जरी केला तरिही :)
पण तुम्ही लिहिलेला blog आणि माझी comment न बिर्ला वाचेल ना सुनिल मित्तल
पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ..!!

Anonymous said...

Aga anu , maza airtel maharashtra cha card band padla hota refill nahi kela mhanun !!

3 months later takun pahila tar GPRS / internet chalu hote... FUKAAAATTTTTT ....

BSNL cha broadband aslyamule kahi watlaa nahi tya fukat chaa .... taree me express highway var enjoy kela online rahun....

ikde mumbai madhye total server room jalalee hotee, tevha pasun asa mhantat kee airtel che network fakt DONGAR aani SAHYADRI var yete...

Prashant said...

great style...

"वॉइस रिस्पॉन्स लावणार्‍याचा गळा दाबण्यासाठी ४ दाबा"

Dk said...

Hmm tula bahutek phaar trass zalela distoy! nahi arthat saglyanch hoto g pan kaaye mi hya ashya caals na shkyto bhrpur vel deto! aani yasmin, arfaan, rohan, nisha vagaire naavanee yenarya exec. na purun urto. fakt maal vaatt hot ki pre paid walyana asa kahi traas hot nasawa pan te tas nahi ye he tu samrth pan lihilys!

Anonymous said...

Phone madhe call recording software taka. Customercare che call record kara. First complain kelyabarobar immediately nodal officer la phone kara. Call attend karnaryashi shivral ani atyant asabhya bhashet bola. Upyog n zalyas postpaid madhe convert karun 1 mahina vaprun bill bharu naka..ya fandat padayche naslyas bsnl ch card ghya. Coverage cha thoda porblem ahe, pan asle prakar hot nahit. Zale tari dad magayla jaga aste.

kumar sonavane said...

khupach sundar lihita tumhi, agadi full2comedy. agadi pot dharun hasalo....... ashech amhala hasawat raha. dhanyawad