या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Tuesday 26 June 2007

एकावर एक मोफत

जीवनाचा डाव अजुनि मांडते आहे
जिंकू पुन्हा हार म्हणुनि मानते आहे

भूतकाळाच्या चुका विसरून आता
हास्य करुनि आसवांना मारते आहे

रात्र काळोखी इथे पुरणार मी
वाट पाहत त्या उषेची जागते आहे

शल्य बाहेरी जगाची मी झुगारून
शांत संसारात माझ्या नांदते आहे

जगाने आता बनविले कोडगे,
प्रेत पूर्वीच्या 'अनु'चे जाळते आहे..
-------------------------------------------------------------------
(बोला राव, वाचून डोळ्यात 'करुणेणे' अश्रू आले की नाही? आता जरा अश्रू पुसून दात विचकूया:)

चेसचा मी डाव अजुनि मांडते आहे
मीच खेळोनि चुकीचे भांडते आहे

'कासवाचे' खोकडे विसरून पुन्हा
जागुनि मी डास आता मारते आहे

भात इतकुसा कसा पुरणार त्याला
संपवून तो वाट त्याची पाहते आहे

'सात फेरे' ची मजा 'हिस्टरी'त नाही
हातुनि रीमोट मीपण हिसकते आहे

टॉम आणिक जेरीला त्या पाहताना
गॅसवरती दूध 'राधा' जाळते आहे..
-------------------------------------------------------------------
-अनु (जी. एम. घाऊक+भावुक गझल उत्पादन व विक्री).

22 comments:

मन कस्तुरी रे.. said...

काय मस्तं गं!

"भात इतकुसा कसा पुरणार त्याला
संपवून तो वाट त्याची पाहते आहे"

फ़ारच छान!
इतकी निगरगट्ट प्रेयसी मिळाल्यावर 'त्याचे' काय हाल असतिल देवच जाणे!
पण फ़ार हसू आलं!
मज्जा वाटली!

अश्विनी

HAREKRISHNAJI said...

मस्त

Abhijit Galgalikar said...

भात इतकुसा कसा पुरणार त्याला
संपवून तो वाट त्याची पाहते आहे

'सात फेरे' ची मजा 'हिस्टरी'त नाही
हातुनि रीमोट मीपण हिसकते आहे

wah wah... :) :)

जगाने आता बनविले कोडगे,
प्रेत पूर्वीच्या 'अनु'चे जाळते आहे..

he sudha tevdhech sundar...

mast ahe blog... wachen halu halu..

Meghana Bhuskute said...

hahapuwa.... :))))))))

पूनम छत्रे said...

ekawar ek mofat!!!!!!! :)
sahi idea. karooN rasaawar haasya ras free!

seriously lihun paha, chan gazal lihishil!

mazhya blog warchya comment baddal dhanyawad :)

Anonymous said...

ज्यांना तख़ल्लुस बेमालूम पेरता येतो त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो! :-)

Anand Sarolkar said...

:(
:)

सर्किट said...

jabarr sahi lihilayes! :-) nako nako, serious gazala nako lihu, tuzya style ne hasyarasaatach lihi.. karan te sarvannach nahi jamat.

kasawache khokaDe visaralyamuLe jaguni Daas punhaa marave laagaNe, laii zakaas basavalayes gazalet. :)

सहज said...

अनु (जी. एम. घाऊक+भावुक गझल उत्पादन व विक्री).

:))))))))

masttt

Udayan said...

मला आपला पत्र वाचुन फार आंनंद झाला ़ मराठी खुप छान आहे ़ प्रयत्‍न चालू ढेवा ़आपला एक मित्र - उदयन पां़ कां़

Meghana Bhuskute said...

where are you? missing your hilarious posts... :(

अनु said...

Many topics in mind for writing, but facing some confusion and not able to present them well..Will soon be back when this mental block is removed.

Chinmay 'भारद्वाज' said...

आपली पहिली गज़ल फारच आवडली. (दुसरीही उत्तम आहे). भावना शब्दात बांधण कठिण कार्य आहे, त्यातुन, कवितेत किंवा गज़लेत बांधणे तर अजुनच कठिण असते. आपल्यास ते खुब जमते.

आपण भाऊसाहेब पाटणकर यांच्या गज़ला वाचल्या आहेत का? नसतील तर अवश्य वाचा.

माझ्या कथेवर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. ती गोष्ट संपूर्णतः काल्पनिक आहे.

HAREKRISHNAJI said...

when is it going to be removed ? I mean mental block ?

all of us are missing your hilarious posts...

Anamika Joshi said...

anu, liha ho. baryach diwasat khadakhadun hasale nahiye mi. :)

prashant phalle said...

की गेट बिल चे काम हे ||
जगी झालिया शहाणे ||
म्हणोनि काय कवणे ||
प्रोग्रामुचि नये ||"
या जगात अनेक बिल गेट, डेनिस रिची,स्टिव्ह जॉब्स सारखे महान प्रोग्रामर झालेही असतील.म्हणून काय आमच्यासारख्याने एवढेसे प्रोग्राम करुन पोट भरुच नये की काय??

ki Rajhansache chalne | Jagi zaliya shahane ||
Mhanoni kay kavane|
chalochi naye ||

= na ????
SO tu sudha Pu La Margi ahes..
baki lihites matra churchurit ho..
chalu theva..

Unknown said...

बहुत बढिया ब्लॉग,
तत्काल पसन्दीदा में डाल दिया गया है, लेकिन

Devidas Deshpande said...

बऱयाच दिवसांपासून तुमच्या नवीन लेखाची वाट पाहतोय. एकावर एक फ्रीचा अर्थ त्यानंतर एकदम बंद असा तर नाही ना?

TheKing said...

Kuthe gayab?

TheKing said...

Kuthe gayab?

Tulip said...

हाय अनु! खूप दिवसांत काही लिहीलं नाहीस तु. आता नंदन ने सुरु केलेला ’आवडता उतारा’ हा tag तुझ्याकडे पास करतेय.
http://maunraag.blogspot.com/

लिही.

Anonymous said...

नव–याला छळणे हा अनुचा जन्मसिद्ध हक्क आहे.

heeheeheehee ....