या अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.

Wednesday, 24 January 2007

कचेरी.. कचेरी..

कशी रे अशी ही कचेरी कचेरी..
सदा लोक येथे मजेच्या विचारी

मिटींगा मिटींगा कितीवेळ केल्या..
समस्या तरीही उभी नित्य दारी

पगारास येथे कधी वाढ नाही..
चिडूनी वदाया परी तोंड नाही

स्वतःचेच डोके अम्हाला नसे ते..
करु शुभ्र साहेब सांगेल ते ते

जगाच्या मनी तो असे नित्य हेवा..
परी आमुचे दुःख अम्हास ठेवा